दोन तास प्रतिक्षा, फक्त दोन मिनिटांचीच झाली चर्चा; संजय राठोड प्रकरणी सस्पेन्स कायम?

मुख्यमंत्र्यांनी अवघे दोन मिनिटेच चर्चा केल्याने राजीनाम्याचा सस्पेन्स कायम आहे

0

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर चर्चेत आलेले वनमंत्री संजय राठोड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी गेले. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी हाेत असताना, मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. मात्र मुख्यमंत्र्यांची दोन तास प्रतिक्षा केल्यानंतर केवळ दोन मिनिटेच चर्चा करून संजय राठोड माघारी फिरल्याने, त्यांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स कायम आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक पार पडल्यानंतर संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मुख्यमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतील अशीही चर्चा रंगली होती. त्यातच विरोधकांनी संजय राठोड यांचा तातडीने राजीनामा घेऊन  त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी केल्याने मुख्यमंत्री काय भूमिका घेतील याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.

हेही वाचा : संजय राठोड प्रकरणी शरद पवार नाराज, पदापासून दूर ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा!

मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी संजय राठोड यांना तब्बल दोन तास प्रतिक्षा करावी लागली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अवघ्या काही मिनिटांसाठीच त्यांना भेट दिली. यावेळेत झालेल्या चर्चेनंतर संजय राठोड आपल्या चर्चगेट येथील शासकीय निवासस्थानी पोहोचले. यावेळी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची कुठलीही माहिती समोर येऊ शकली नाही. मात्र संजय राठोड यांच्या चेहऱ्यावरील हावभाव तणावग्रस्त दिसत असल्याने, त्यांच्या राजीनाम्याबाबतचा सस्पेन्स आणखीनच वाढला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी जाताना मंत्री संजय राठोड

दरम्यान, आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राठोड व इतर मंत्री उपस्थित होते. परंतु, कॅबिनेटच्या बैठकीत संजय राठोड प्रकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती मिळाली .परंतु, कॅबिनेट बैठकीनंतर वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. वर्षा बंगल्यावर सर्व शिवसेना नेत्यांची बैठक सुरु होती. त्यामुळे आता संजय राठोड यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.