गोव्यात शिवसेनेचाच विजय; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

वास्को येथे सभा घेत त्यांनी गोव्यातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला

0

पणजी : लोकराष्ट्र वृत्तसेवा

राज्याचे पर्यावरणमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे शुक्रवारपासून गोव्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या काही सभांचे आयोजन केले असून, प्रचारात आघाडी घेण्यासाठी त्यांनी उडी घेतली आहे. शुक्रवारी त्यांनी वास्को येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेमके धोरण काय असणार याबाबतचे स्पष्टीकरण देताना शिवसेनेचा दररा काय असतो, शिवसेना आली म्हणजे नक्की काय असतं? हे या गोव्याच्या राजकारणाला आता कळायला लागले आहे. असेही आदित्य ठाकरे यांनी आवर्जून सांगितले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, या राज्याशी शिवसेनेचे वेगळं नातं आहे. कित्येक जणांचे कुलदैवतं, मंदिरं, गावं, घरं इथे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जसे सांगितले की भूमिपुत्रांना न्याय द्या, तेच काम आपण आज इथे करण्यासाठी आलेलो आहोत. जरी आपले महाराष्ट्रात असेल, सरकार असेल आपण सगळे प्रचारासाठी तिथून आलेलो असूत, तरी जेव्हा गोवा बद्दल आपण बोलतो तेव्हा आपण प्राधान्य स्थानिक गोवेकरांना देणार आहोत. हा मी तुम्हाला शब्द देण्यासाठी आलेलो आहे.

इथे शिवसेना म्हणून लढत असताना, पुढे जात असताना साखळीत तर मी प्रचाराला पुढे आलोय पण जोडसाखळी मी खेळणार नाही. शिवसेना म्हणून एक आपलं धोरण आहे, प्रत्येक राज्य, जिल्हा, शहर, गाव तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यायाचा म्हणजे नेमकं काय करायच? हे शिवसेनेकडून समजून घेतलं पाहिजे. या निवडणुकीत विजय आपलाच आहे, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.