Video : शिवजन्म सोहळा : किल्ले शिवनेरी दुमदुमली ; ढोल ताशांचा गजर, घोषणांनी आसमंत निनादला!

शिवरायांची किर्ती जगभरात पोहोचविणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

पुणे : ढोल ताशाचा गजर, सळसळणारा उत्साह, गगनभेदी घोषण अशा ऊर्जा निर्माण करणाऱ्या उत्साही वातावरणात शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवभक्तांनी महाराजांच्या दिलेल्या घोषणांनी संबंध आसमंत निनादल्याचे दृश्य बघावयास मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याचा उत्साह काही औरच होता. महाराजांच्या या सोहळ्यासाठी शिवनेरी जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी शिवभक्तांमधील उत्साह बघण्यासारखा होता.

या सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांना जोडून ठेवणारा धागा आहे. शिवरायाची किर्ती आणि तेज जगभरात पोहोचविण्याचे काम सरकारच्या माध्यमातून केले जाणार आहे.  छत्रपतींनी ज्या लढाया लढल्या. जो स्वराज्यावर चालून आला, त्याची विल्हेवाट कशी लावली हे तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही. आता तसं युद्ध नसलं तरी करोनाबरोबर आपलं युद्ध सुरू आहे. या युद्धात मास्क ही ढाल आहे. अनेक राजे झाले. अनेक लढाया झाल्य, पण छत्रपतींचं वेगळेपण काय तर युद्ध जिंकण्यासाठी जी जिगर आणि प्रेरणा लागते ती शिवाजी महाराजांनी दिल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘शिवनेरीवर येण्याचं हे दुसरे वर्ष आहे. हा बहुमान माता जिजाऊ व शिवरायांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे लाभला आहे. मनात, ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान आहे. त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होतच राहते. सध्या वातावरण चांगले आहे, पण तोंडावर मास्क आहे.

आपली करोनाशी आपली लढाई सुरू आहे. छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या हाती ढाल तलवारी आज नसल्या तरी करोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका. करोनाशी लढतांना छत्रपतींकडून प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. राजकारण बाजुला पण, आमच्या सगळ्यांच्या मनात शिवप्रेम आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज संपूर्ण जगात पसरवू’ असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.