शिल्पा शेट्टी, फराह खानचे झाले भांडण, ‘शिल्पाने माझ्या पोटावर लाथ मारली’ फराहचा आरोप, पाहा व्हिडीओ!

दोघींचा हा भांडणाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे

0

चित्रपटात फारशी दिसत नसलेली बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी रिॲलिटी शोमुळे चांगलीच चर्चेत असते. सध्या ती डान्स इंडिया डान्स या अत्यंत लोकप्रिय असलेल्या रिॲलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे.त्याव्यतिरिक्त शिल्पा सोशल मीडियामुळे भलतीच चर्चेत असते. ती नेहमीच तिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. सध्या तिने नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आहे.

व्हिडीओमध्ये ती चक्क दिग्दर्शक फराह खानसोबत भांडताना दिसते. अर्थातच हे भांडण म्हणजे दोघींमधील खोडसाळपणा आहे. शिल्पाने हा मजेशीर व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा सुरुवातीला गुलाबी रंगाची साडी नेसून एक जाहिरातीच्या चित्रीकरणाची वाट पाहताना दिसत आहे. दरम्यान फराह खान तेथे पोहोचते आणि ही जाहिरात अगोदर मी करणार होते. शिल्पाने माझ्या पोटावर पाय दिला आहे असा आरोप करते.

त्यावर शिल्पा शेट्टी म्हणते, ‘हा पोटाचा प्रश्न आहे. ही जाहिरात मला माझ्या पोटामुळेच मिळाली आहे. आता ही जाहिरात आम्ही दोघी मिळून करत आहोत.’ फराह आणि शिल्पाची व्हिडीओमधील केमिस्ट्री भन्नाट असून, चाहत्यांना ती खूपच पसंतीस उतरत आहे. त्याचीच प्रचिती म्हणून आतापर्यंत हा व्हिडीओ १६ लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. लकवरच शिल्पा शेट्टी ‘निकम्मा’ आणि हंगामा-२ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून शिल्पा तब्बल १३ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.