हे शेरजीलचं सरकार, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल!

0

मुंबई : ‘शरजीलला अद्यापपर्यंत अटक केली नाही. मात्र त्याला अटक केली नाही, म्हणून भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीने आंदोलन केले. सरकारने भाजपच्या पदाधिकाऱ्यांना घरात जाऊन ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे आश्चर्य वाटते. हे सरकारच शरजीलचं आहे. त्याला संरक्षण देणारं हे सरकार आहे, असं आम्ही म्हणालो तर काय चुकलं? असा सवाल उपस्थित करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला. 

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होता. त्यानंतर सरकारने त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, याबाबतचे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला पत्र लिहिले होते. त्यानुसार पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र अद्यापयर्पंत त्याला अटक करण्यात आली नसल्याने, हे सरकार शेरजीलचं असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. भाजपच्या मुंबई प्रदेश कार्यालयातील आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी सेलिब्रिटींच्या चौकशीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सेलिब्रिटींच्या चौकशीची ज्याने मागणी केली अन्‌ त्यास ज्याने मंजूरी दिली त्या दोघांचेही मानसिक संतुलन बरोबर नाही. त्यामुळे सेलिब्रिटींची चौकशी केल्यापेक्षा त्यांच्या मानसिक संतुलनाची चौकशी करणे गरजेचे असल्याचेही फडणवीस म्हणाले. भारताच्या अखंडतेवर हल्ला होऊ देणार नाही, असे म्हणणे चुकीचे असेल तर आपल्या सगळ्यांनाच सरकारने अटक करावी, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.