पाकिस्तानात अखेर शरीफ सरकार; पंतप्रधान पदासाठी शाहबाज शरीफ यांच्‍या नावावर एकमत

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे शाहबाज हे भाऊ आहेत

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

इम्रान खानचे सरकार अखेर कोसळले असून, पाकिस्तानातील राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. सोमवारी (दि.११) देशाचे नवे पंतप्रधान कोण होणार हे स्पष्ट होणार आहे. पाकिस्‍तानमधील मीडिया रिपोर्ट्‍सनुसार, इम्रान खान यांच्‍या तेहरीक-ए-इन्‍साफ पक्षाच्‍या विराेधात एकवटलेल्‍या मित्र पक्षांनी एकमताने पंतपधानपदासाठी पाकिस्‍तान मुस्‍लिम लीग-नवाजचे शाहबाज शरीफ यांना उमेदवारी दिली. शाहबाज हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधू आहेत.

पाकिस्‍तान पीपल्‍स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्‍टो यांच्‍याकडे पाकिस्‍तानचे पराराष्‍ट्र मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्‍याची शक्‍यता आहे. दरम्‍यान इम्रान खान यांचा तेहरीक-ए-इन्‍साफ पक्षाने माजी परराष्‍ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांना उमेदवारी दिली आहे.

एआरवाय न्‍यूजने दिलेल्‍या वृत्तानुसार, पाकिस्‍तानमध्‍ये  इम्रान खान यांच्‍या तेहरीक-ए-इन्‍साफ पक्षाच्‍या विराेधात एकवटलेल्‍या मित्र पक्षांनी एकत्रीतपणे पंतप्रधानपदाचे उमेवार म्‍हणून पाकिस्‍तान मुस्‍लिम लीग-नवाझ पक्षाचे शाहबाज शरीफ यांचे नाव सुवचले. यानंतर शाहबाज यांनी ट्‍विटरवरुन सर्व मित्रपक्षाच्‍या नेत्‍यांसह कार्यकर्त्यांचे आभार मानले.

शनिवारी रात्री उशिरा पाकिस्‍तान राष्‍ट्रीय संसदेत इम्रान खान सरकारविरोधातील अविश्‍वास प्रस्‍तावावर मतदान होण्‍यापूर्वी संसदेचे सभापती, उपसभापतींनी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला. यानंतर रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी अविश्‍वास प्रस्‍तावावर मतदान झाले. इम्रान खान सरकारविरोधात १७४ मते पडली. त्‍यांचे सरकार सत्तेतून पायउतार झाले. आता सोमवार दि. ११ रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्‍यात आले आहे. यावेळी देशाच्‍या नव्‍या पंतप्रधानपदासाठी मतदान होणार आहे. शाहबाज शरीफ यांच्‍या पंतप्रधानपदी निवड झाल्‍याची औपचारिक घोषणा होणे बाकी असल्‍याचा दावा विरोधी पक्षाचे नेते करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.