मग शरद पवार कुस्ती न खेळता कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष कसे झाले?, सदाभाऊ खोत यांचा सवाल!

0

सातारा : दोन दिवसांपूर्वी पुण्यात एका कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांनी मास्टर बालस्टर सचिन तेंडुलकर यास ‘जो विषय वा क्षेत्र आपले नाही, त्याबद्दल बोलताना थोडी काळजी घ्या’ असा सल्ला दिला होता. आता यावरून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार पवार यांच्यावर टीका केली आहे. शेतकरी आंदोलनावर बोलणाऱ्या सचिनला सल्ला देताना शरद पवार कधी कुस्ती खेळले, कुठे क्रिकेट खेळले काय? तरीही ते क्रिकेट बोर्डाचे व कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष झाले ना? मग ते कसे झाले? अशी टीका खोत यांनी केली आहे. 

सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधताना खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. इतरांना काहीही कळत नाही, ही पध्दत महाराष्ट्रात घट्ट होत असून, दीर्घकाळाच्या अनुभवामुळे सगळं काही मलाच मिळालं पाहिजे ही रित मारक असल्याचे मत खोत यांनी व्यक्त केले. यामुळेच ज्या क्षेत्रांशी या मंडळींचा संबंध नाही, पण अशातही त्याचे पदे भुषविले असल्याची टीका खोत यांनी केली.

तसेच त्यांनी शेतकरी आंदोलनाचा बुरखा पांघरून काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवायला चालले असेही म्हटले. जगभरातून नरेंद्र मोदी यांना कोणी हरवू शकले नाही, आत शेतकरी आंदोलनात बुरखा पांघरून हे लोक अयशस्वी प्रयत्न करीत असल्याचेही खाेत यांनी म्हटले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. त्यामुळे विरोधकांनी शेतकऱ्यांची चिंता करू नये. शेतकरी पिछाडीवर असल्याचे चित्र बदलण्यासाठी हे तीन कृषी कायदे आणले गेल्याचे मतही खोत यांनी व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.