संजय राठोड प्रकरणी शरद पवार नाराज, पदापासून दूर ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा!

संजय राठोड यांचे मंत्रिपद धोक्यात असल्याचे बोलले जात आहे

0

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दररोज नवने खुलासे समोर येऊ लागल्याने सरकारच्या अडचणीत वाढ होत आहे. आता सरकारचे तारणहार समजले जाणार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. संजय राठोड यांनी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांना जमवून केलेल्या शक्तीप्रदर्शनानंतर शांत, सयंमी आणि शिस्तप्रिय असलेल्या मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून हल्लाबोल केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या नियमांचे त्यांच्याच मंत्र्यांकडून उल्लंघन केले जात असेल तर सामान्य जनतेकडून काय अपेक्षा ठेवायच्या असा प्रश्नही माध्यमांद्वारे उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

READ ALSO : पूजा चव्हाण प्रकरणातील हा ‘गबरु’ नक्की कोण आहे?, जाणून घ्या सत्य!

संजय राठोड प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत वनमंत्री संजय राठोड यांना पदापासून दूर राहायला हवं, अशी शरद पवार यांनी भूमिका घेतल्याने आता संजय राठोड यांचे मंत्रीपद धोक्यात आहे. त्याचबरोबर राठोड राजनीमा देणार की नाही? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधनाता कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा असे आवाहन केले होते. त्याचबरोबर सार्वजनिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम करु नये असे आवाहनही केले होते. मात्र अशातही राठोड यांनी शक्तीप्रदर्शन करीत कोरोनाबाबत शासनाने घालून दिलेल्या निमयांची एैशीतैशी केली. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फासला. दरम्यान, यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, सरकारच्या भूमिकेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

READ ALSO : पोहरादेवी येथील गर्दीबाबत मुख्यमंत्र्यांचे तत्काळ चौकशीचे आदेश, शक्तीप्रदर्शन भोवणार!

याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांनी वर्षा निवासस्थांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. महाविकास आघाडी सरकारमधील नेते धनंजय मुंडे यांच्यावर आणि आता वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले. परंतु, या दोन प्रकरणांमध्ये दोन महत्त्वाचे फरक आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेनं आपली तक्रार मागे घेतली होती. परंतु, संजय राठोड यांच्या प्रकरणात एक मुलीचा मृत्यू झाला आहे. अशातच संजय राठोड हे गेल्या पंधरा दिवसांपासून नॉट रिचेबल होते. त्यांनी याप्रकरणी कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं. तसेच आज संजय राठोड यांनी समाजाची ढाल पुढे करून शक्तिप्रदर्शन केलं. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदापासून दूर राहावे अशी भूमिका शरद पवार यांनी घेतल्याने, संजय राठोड यांचे मंत्रिपद आता धोक्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.