नाशिक जिल्ह्यातील शाळा ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

दहावी, बारावीचा निर्णय पालकांसाठी असेल ऐच्छिक

0

नाशिक : शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. शहरात अनेक निर्बंध लागू करताना शाळादेखील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी, बारावींच्या वर्गांबाबतचा निर्णय मात्र पालकांसाठी ऐच्छिक असेल, अशी माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.

मार्च महिन्यांच्या प्रारंभीच शहर व परिसरातील शाळा, महाविद्यालये १५ मार्चंपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होऊ लागल्याने, हा निर्णय ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या दहावी, बारावींच्या परिक्षांची लगबग आहे. मात्र राज्यात ज्या पद्धतीने रुग्णसंख्या वाढत आहे, त्यावरून या परिक्षा ऑनलाइन घेणार की ऑफलाइन याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशात आता पुन्हा ३१ मार्चपर्यंत शाळा बंदचा निर्णय घेण्यात आल्याने, विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे.

याबाबत मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले की, दहावी-बारावीच्या परिक्षा ऑनलाइन घेणार की, ऑफलाइन याबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाणार आहे. मात्र शहर परिसरात ज्या पद्धतीने रुग्णसंख्या वाढत आहे, त्यावरून शाळा, बंदचा निर्णय हा घ्यावाच लागणार आहे. दहावी, बारावी वर्ग मात्र पालकांच्या संमतीने सुरू राहू शकतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.