…और घमंड ज्यादा हो तो हस्तियाँ डूब जाती है, संजय राऊत यांनी शायरी अंदाजात भाजपवर साधला निशाणा!

0

मुंबई : सिंधुदुर्गात आलेल्या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना ‘बाळासाहेब गेले आणि शिवसेनेचा सिद्धांत बुडाला अशी टिका केली होती. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करीत अमित शाह यांच्या टिकेला उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी शायरी अंदाजात हे ट्विट करीत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘तुफान ज्यादा हो तो, कश्तियां डूब जाती है…और घमंड ज्यादा हो तो हस्तियाँ डूब जाती है’

खासदार नारायण राणे यांच्या लाइफटाइम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाल्याचे यावेळी त्यानी सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेला कुठलेही वचन दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. याला उत्तर देताना खासदार राऊत यांनी ट्विट केले. यावेळी त्यांनी राज्यसभेतही भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडले.

त्यांनी म्हटले की, गेल्या सहा वर्षांपासून खोट्यालाही खरे करण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला आहे. पत्रकार राजदीप सरदेसाई, काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो.  जो खरं बोलतो किंवा लिहितो त्याला गद्दार, देशद्रोही संबोधले जाते. जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा ठोकला जातो. पद्म पुरस्कार विजेते  राजदीप सरदेसाई, काँग्रेस नेते शशी थरूर, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनावर लिहिणारे पत्रकार मनजीत सिंह आणि अशा अनेक लेखक, पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मग अर्णब गोस्वामी, कंगना रानौत हे देशप्रेमी आहेत काय? असा सवालही त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला.

अर्णब गोस्वामी, शेतकरी प्रश्न तसेच अभिनेत्री कंगना रानौत हिच्याविषयी सरकारला जाब विचारताना लाल किल्यावर तिरंग्याचा अपमान झाला. मात्र, हा अपमान कोणी केला? त्याला तुम्ही पकडले का? असा प्रश्नही त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला. हजारो शेतकरी गाझीपूर, सिंघू सीमेवर आपल्या हक्कासाठी लढत आहेत. पंजाब, हरियाणामधील शेतकरी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत आहे. मग तो देशद्रोही आहे काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.