पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले, धक्कादायक खुलासा!

पूजा चव्हाणची अजय शांताबाई राठोड यांचा खळबळजनक दावा

0

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात न्यायाची मागणी होत असताना, तिच्या आई-वडिलांकडून मात्र कुठलीच अशी ठोस भूमिका घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. पूजाच्या आत्महत्येला २० दिवस उलटून देखील साधा गुन्हा दाखल करण्याबाबत देखील विचार केला गेला नाही. उलट या प्रकरणात नाव असलेल्या माजी मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा देऊ नये, अशी भूमिका पूजाच्या आई-वडिलांनी घेतल्याने, या प्रकरणाला वेगळीच हवा मिळत आहे. दरम्यान, पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचविल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकारी वर्गाची चर्चा केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शांताबाई यांनी म्हटले की, संजय राठोड यांनी रविवारी राजीनामा दिला, मात्र त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. तसेच त्यांनीच याप्रकरणी लक्ष घालावे आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणार असल्याचे पूजाच्या आजीने म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचविल्याचा खळबळजनक दावाही केला आहे. तसेच पैसे मिळाल्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्येविषयी काही बोलायचे नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यादेखील उपस्थित होत्या. शांताबाई म्हणाल्या की, पूजा चव्हाणच्या घटनेत तिचे आई वडील अद्यापही काही बोलत नाही. त्या दोघांना संजय राठोड यांच्याकडून पाच कोटी रुपये देण्यात आले असून त्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत. योग्यवेळी ते पुरावे समोर आणणार आहे. तसेच, मी या प्रकरणी भूमिका मांडत असल्याने माझ्या जीवालाही धोका आहे, असेही शांताबाई राठोड म्हणाल्या.

दरम्यान, वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर या प्रकरणात होत असलेली आमची बदनामी थांबवावी असे पूजाच्या आई-वडिलांनी म्हटले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक चिठ्ठी लिहून त्यांनी संजय राठोड यांना क्लिनचिट दिली होती. आमच्या मुलीच्या नावाने राजकारण करू नका, संजय राठोड यांनी राजीनामा देऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र आता त्यांच्या या भूमिकेवर पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनीच शंका उपस्थित केल्याने, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखी एक खळबळजनक दावा समोर आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.