संख्याबळ असतानाही भाजपचा पराभव, सांगली महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता

भाजपला बंडखोरी थोपविण्यात सपशेल अपयश आले

0

सांगली : बहुमत असतानाही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागण्याचा प्रकार सांगली महापालिकेत समोर आला आहे. भाजपला बंडखोरीसह पक्ष साबूत ठेवण्यात सर्वच पातळ्यांवर अपयश आल्याने, हातातील सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात सोपवावी लागली. भाजपच्या या घोर अपयशामुळे सांगली महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रसेच्या उमेदवारांला महापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळाली. तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या उमेदवाराची निवड केली गेली. सत्ताधारी भाजपला मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. बंडखोरीमुळेच भाजपच्या हातातून सत्ता गेल्याची चर्चा आता रंगत आहे.

सांगली महापालिकेत महामौर, उपमहापौर पदासाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना बघावयास मिळाला. यामध्ये घोडेबाजार जोरात चालणार असल्याने सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान होते. त्यातही भाजपकडे बहुमत असल्याने त्यांना बंडखोरीचा मोठा फटका बसणार होता. त्यामुळे ही बंडखोरी थोपविण्यासाठी भाजपला मोठे प्रयत्न करावे लागणार होते. परंतु भाजपचे प्रयत्न अपुरे ठरले. सत्ताधारी भाजपची तब्बल पाच मते फुटल्याने महापौर, उपमहापौरपदी महाविकास आघाडीच्या उमेदावराला संधी मिळाली.

महापैर निवडीदरम्यान, भाजपचे दोन सदस्य गैरहजर होते. तर उर्वरीत तीन मते फुटल्याने भाजपला सत्तेवर पाणी सोडावे लागले. दरम्यान, सांगली महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आली असून, महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी तर उमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील विजयी झाले आहेत. महापालिकेतील बलाबल विषयी विचार केला असता, भाजप या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ४१ सदस्य आहेत. तर दोन अपक्षांनी त्यांनी पांठिबा दिल्याने त्यांचे ४३ इतके संख्याबळ होते.  माजी महापौर हारूण शिकलगार यांचे अकाली निधन झाल्याने काँग्रेसचे १९, तर राष्ट्रवादीचे १५ सदस्य आहेत. बहुमतासाठी ३९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक होता.

जयंत पाटील यांच्या रणनीतीने सत्तांतर

जयंत पाटील यांनी महापालिका महापौर निवडीच्या निमित्ताने सांगलीतील काँग्रेसमधील सर्व गट एकत्र आणले. सांगलीतील काँगेसमधील वसंतदादा घर, मदन पाटील गट, पृथ्वीराज पाटील यांना एकत्र आणत जयंत पाटील यांनी महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर तर काँगेसचा उपमहापौर बसवला आहे. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सूर्यवंशी महापौर तर विशाल पाटील गटाचे उमेश पाटील उपमहापौर बनले. तसंच मदन पाटील गटाला महापालिकेतील महत्त्वाची पदे देण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील देखील राष्ट्रवादीसोबत राहिले.

असे होते बलाबल

दिग्विजय सूर्यवंशी – ३९,  धीरज सूर्यवंशी – ३६, (१ सदस्य निधन) तटस्थ -२, एकूण संख्याबळ – ७८

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.