नवं संकट : बर्ड फ्लूची तब्बल सात जणांना लागण, जगातील पहिलीच घटना!

रशियातील या घटनेमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे.

0

रशिया : कोरोनाचा धोका आणखी वाढत असतानाच बर्ड फ्लूचे नवे संकट उभे ठाकले आहे. राज्यात बर्ड फ्लूने थैमान घातले असून, बहुतांश भागातील पोल्ट्री फार्ममधील लाखो कोंबड्यांना नष्ट करण्यात येत आहे. सुदैवाने भारतात मनुष्यला अद्यापपर्यंत बर्ड फ्लु झाला नसला तरी, रशियातील एका घटनेमुळे संबंध जग हादरून गेले आहे. पक्षाला होणारा हा आजार आता माणसांनाही होताना दिसत आहे. रशियात पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या तब्बल सात कामगारांना बर्ड फ्लू (एच५ एन ८) या आजाराची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. माणसाला बर्ड फ्लूची एवढ्या मोठ्या संख्येने लागण होण्याची जगातील ही पहिलीच घटना असून, या घटनेची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आली आहे.

अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जग हतबल असताना या नव्या संकटामुळे माणूस हादरून गेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियासह युरोप, चीन, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये बर्ड फ्लूचा (एच५ एन ८) उद्रेक झाला आहे. परंतु बर्ड फ्लूचा संसर्ग केवळ पोल्ट्रीतील कोंबड्यांना किंवा इतर पक्षांना होत असल्याचेच समोर आले आहे. मात्र रशियातील या घटनेनंतर हा आजार आता माणसालाही होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रशियात पहिल्यांदाच बर्ड फ्लूचे रुग्ण आढळून आल्याने, संपूर्ण जग चिंतेत सापडले आहे.

ग्राहक आरोग्य वॉचडाॅक रोस्पोट्रेबनाडझोरचे प्रमुख ॲना पोपावा यांनी रोशिया २४ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, अनेक वर्षांपासून आम्ही या निष्कार्षावर होतो की, माणसाला बर्ड फ्लूची शक्यता नाही. मात्र, बर्ड फ्लूने संक्रमित जिवंत वा मृत कोंबडीच्या थेट संपर्कात आल्याने संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थितपणे शिजवून खालेलं अन्न सुरक्षित आहे. माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेलाही देण्यात आली आहे, असं पोपोवा म्हणाल्या.

‍दक्षिण रशियात एका पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या तब्बल सात कामगारांना बर्ड फ्लू या आजाराची लागण झाली आहे. या पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या डिसेंबर महिन्यातच बर्ड फ्लूचा उद्रेक झाला होता. मात्र, माणसाला याची लागण झाल्याचा प्रकार समोर आला नव्हता. शिवाय या पोल्ट्रीमध्ये पुन्हा बर्ड फ्लूचा प्रकारही समोर आला नव्हता, असेही पोपोवा यांनी सांगितले. दरम्यान, भारतात विविध भागांमध्ये बर्ड फ्लू या आजारांमुळे पक्षी दगावल्याचे सामेर आले आहे. स्थलांतरीत पक्षांमुळे भारतात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून, यंत्रणा त्याबाबतची माहिती घेत आहे. दरम्यान, चिकन चांगल्या पद्धतीने शिजवून घेतल्यास बर्ड फ्लूचा विषाणू त्यातून नष्ट होतो व चिकन खाण्यास सुरक्षित राहते, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.