रोहित शर्माच्या उत्तुंग षटकारावर पत्नी रितिका फिदा; ‘या’ क्युट अंदाजात तिने पतीचे वाढवले मनोबल!

0

चैन्नई : भारताची टॉप ऑर्डर गेल्या कसोटी सामन्याप्रमाणे याही कसोटी सामान्यात ढेपाळल्याचे दिसून आले. ओपनिंग फलंदाज शुभमन गिल आणि कर्णधार शुन्यावर बाद झाल्यानंतर भारताचा डाव संकटात सापडला होता. त्यातच भारताचा संकटमोचक चेतेश्वर पुजारा (२१) स्वस्तात बाद झाल्याने कर्णधार विराट कोहलीचा फलंदाजीचा निर्णय चुकतो की काय? अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र हिट मॅन रोहित शर्माने एकहाती मोर्चा सांभाळत इंग्लंडच्या गोलंदाजीचा भरपूर समाचार घेतला. त्याला उपकर्णधार अजिंक्य रहाणेची साथ मिळाली. रोहितच्या या महत्त्वाच्या दीडशतकी खेळीत त्याची पत्नी रितिका हिचेही मोठे योगदान आहे. तिने रोहितचे चांगलेच मनोबल वाढविल्याचे दिसून आले. 

हिटमॅन रोहितने आपल्या १६१ धावांच्या खेळीत सणसणीत १८ चौकार खेचले. तर दोन उत्तुंग षटकार ठोकले. एका षटकारावर त्याची पत्नी रितिका चांगलीच फिदा झाल्याचे दिसून आले. तिने दिलेली रिॲक्शन बघून मैदानातील अनेकजण अवाक झाले. इंग्लंडच्या बेन स्टोक्सने रोहितला आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. त्या चेंडूचचा समाचार घेत रोहितने पूल शॉट खेळत षटकार मारला. त्याचा षटकार पाहून रितिका दंग राहिली. तसेच प्रेक्षकांनीही रोहितच्या या षटकाराचा चांगलाच आनंद घेतला. रोहितने डावाच्या सुरुवातीपासूनच एक वेगळीच लय पकडली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये वन-डे क्रिकेटप्रमाणे फटकेबाजी करण्यास सुरूवात केली.

दरम्यान, रोहितने दमदार खेळ सुरू ठेवला. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा वेळोवेळी समाचार घेत त्याने अर्धशतक लगावले. रोहितचे हे कसोटी कारकिर्दीतील १२ वे अर्धशतक ठरले. ऑस्ट्रेलियातील कसोटी सामने आणि इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितला चांगली सुरूवात मिळूनही त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करणं शक्य होत नव्हते. पण दुसऱ्या कसोटीत त्याने अर्धशतक ठोकत टीकाकारांना बॅटने उत्तर दिलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.