Video : रितेश देशमुखने पत्नी जेनेलियासमोर जोडले हात, पाहा व्हिडीओ!

0

सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव असणाऱ्या अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल असलेल्या या दोघांचेही व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांकडून नेहमीच पसंत केले जातात. यादेखील व्हिडीओ असाच पसंत केला जात आहे. रितेश आणि जेनेलियाचे बहुतेक व्हिडीओ रोमॅण्टिक आणि कॉमेडी, मस्तीचे असतात. हाही व्हिडीओ तसाच काही आहे. मात्र या व्हिडीओमध्ये रितेश चक्क जेनेलियाला हात जोडताना दिसत आहे. 

होय, रितेश-जेनेलियाचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून, यामध्ये दोघेही मस्तीचे मुडमध्ये दिसत आहेत. मजेशीर असलेल्या या व्हिडीओला त्यांच्या चाहत्यांकडून तुफान लाइक्स आणि हिट्‌स मिळत आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये जेनेलिया रितेशसमोर नॉनस्टॉप बडबड करताना दिसत आहे. जेनेलियाची ही बडबड ऐकूण रितेश चक्क जांभई देत असल्याने, जेनेलिया त्याच्यावर चांगलीच भडकते. ‘मी काही बोलत असताना तू जांभाई काय देतोस?’ अशी ती त्याला प्रश्न विचारते. अगोदरच नॉनस्टॉप बडबड ऐकूण बिचारा रितेश तिला नम्रपणे म्हणतो की, मी जांभई देत नसून, काही तरी बोलण्याचा प्रयत्न करतो’  मात्र जेनेलिया त्याचं काहीही न ऐकता नॉनस्टॉप बडबड सुरूच ठेवते.

जेनेलिया थांबतच नसल्याचे बघून अखेर रितेश तिच्यासमोर हतबल होऊन हात जोडतो. या धमाल व्हिडीओला सध्या त्यांच्या चाहत्यांकडून जबरदस्त पसंती मिळत आहे. बायकोपुढे नवऱ्यांची बोलती बंद होते, हे सांगण्याचे कॉमेडी अंदाजात केलेला हा प्रयत्न चांगलाच यशस्वी होताना दिसत आहे. खरं तर रितेश-जेनेलियाची केमिस्ट्री नेहमीच हिट राहिली आहे. या दोघांच्या नात्यांमधील गोडवा दर्शविणारे मजेशीर व्हिडीओ या दोघांकडून नेमहीच व्हायरल केले जातात. त्यास चाहत्यांची तुफान पसंती मिळते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.