पाकिस्तानी झेंड्यासोबतचा तो फोटो एडिटेड; फोटो व्हायरल करण्यामागे ‘यांचा’ हात!

त्तर प्रदेशचे भाजप प्रवक्ता शलभ मनी त्रिपाठी आणि भाजप युवा मोर्चा कार्यकर्ता अभिषेक मिश्रा यांचा रिहानाचा तो फेक फोटो व्हायरल करण्यामागे हात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

0

राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पांठिबा देणारी अमेरिकेची पॉप गायिका रिहाना सध्या भलतीच चर्चेत आहे. दरदिवसाला तिच्याबाबत नवा खुलासा समोर येत आहे. आता तिचा पाकिस्तानी झेंड्यासोबतचा एक फोटो व्हायरल होत असून, ती पाकिस्तानी फॅन असल्याचा सोशल मीडियावर प्रसार केला जात आहे. तिने केलेले शेतकरी समर्थनार्थचे ट्विट हा पाकिस्तानचाच कट असल्याचेही ठासून सांगितले जात आहे. वास्तविक यामागचे वास्तव वेगळेच असून, त्या फोटोमागचे नेमके सत्य काय, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

रिहानाने शेतकरी आंदोलनाला पांठिबा देणारे ट्विट केले अन्‌ एकच खळबळ उडाली. देशातील काही दिग्गज क्रिकेटपटूंनी देशाची एकता आणि अखंडता याबाबतचे ट्विट करून याविरोधात उडी घेतली होती. तर दुसरीकडे रिहानाच्या त्या ट्विटला गेल्या वर्षभरात सर्वाधिक रिट्विट मिळाले. दुसऱ्या दिवशी लगेच समोर आले की, रिहानाने ते ट्विट पैसे घेऊन केले आहे. त्यासाठी तिला तब्बल १८ कोटी रुपये मिळाले आहेत. आता तिचा पाकिस्तानी झेंड्यांसोबतचा फोटो व्हायरल होत आहे.

फोटोमध्ये रिहानाने क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानचा फ्लॅग हातात घेऊन पाकिस्तानी टिमला समर्थन दिल्याचे दाखविण्यात येत आहे. मात्र हा फोटो पूर्णपणे बनावट आहे. एडिटींग करून तसे दाखविले जात आहे. द लॉजिकल इंडिया या इंग्रजी वेबसाईटनेही याबाबतचा खुलासा केला आहे. उत्तर प्रदेशचे भाजप प्रवक्ता शलभ मनी त्रिपाठी आणि भाजप युवा मोर्चा कार्यकर्ता अभिषेक मिश्रा यांचा रिहानाचा तो फेक फोटो व्हायरल करण्यामागे हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण रिहानाचा हा फोटो प्रथम अभिषेक मिश्रानेच ट्विट केला आहे. त्यानंतर त्रिपाठीने तो रिट्विट केला आहे. त्यानंतर रिहानाचा हा फोटो  वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र अनेकांनी या फोटोमागील सत्य शोधून काढत रिहानाला पाकिस्तानी समर्थक म्हणविणाऱ्यांना उघडे पाडले आहे.

दरम्यान, गुगल रिव्हर्स सर्चमध्ये हा फोटो शेअर केल्यानंतर आयसीसीचे जुलै २०१९ मधील एक ट्विट समोर येते. आयसीसीने ट्विट केलेल्या फोटोमध्ये रिहानाने वेस्ट इंडिजला झेंडा हातात घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. २०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपमधील वेस्ट इंडिज विरूद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यात रिहानाने वेस्ट इंडिज संघाला पांठिबा दिला होता. त्यादरम्यानचा रिहानाचा हा फोटो असून, तो एडिट करून हेतुपुरस्कर व्हायरल केला जात आहे. मात्र हे सत्य समोर आल्याने, व्हायरल करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.