शेतकरी आंदोलनाच्या एका ट्विटसाठी रिहानाला मिळाले तब्बल १८ कोटी

नवा वाद : जगभरात उडाली खळबळ

0

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी ट्विट करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना हिला एका ट्विटसाठी तब्बल १८ कोटी रुपये मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कॅनडा इथली संस्था पोएटिक जस्टिस फाउंडेशनने शेतकरी आंदोनलाचा प्रचार जगभरात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कॅनडाच्या बाहेरील अनेक राजकीय नेते कार्यकर्त्यांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन करत आहेत, असे द प्रिंट वृत्तपत्राच्या माहितीनुसार ऑप इंडियाने म्हटले आहे. 

स्कायरॉकेट नावाच्या एका पीआर कंपनीने पॉपस्टार रिहाना हिला एक ट्विट करण्यासाठी तब्बल १८ कोटी दिल्याचे द प्रिटने म्हटले आहे. पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिला दिलेले टुलकिट स्पून फिडिंग करण्यासाठी दिले गेले होते. देशात अशांतता पसरविण्यासाठी असे प्रकार मोठ्या प्रमाणात केले जात होते, असंही द प्रिंटला सुत्रांनी सांगितले आहे. मो धालीवाल हे पोएटिक जस्टिस फाउंडेशनचे संचालक आहेत. अनिता लाल यासुद्धा पोएटिक जस्टिस फाउंडेशनच्या सहसंस्थापक आहेत. या संघटनेने ग्रेटा थनबर्गला टुलकिट उपलब्ध करून दिले होते.

शेतकरी आंदोलनाबाबत का बोलले जात नाही, असे पॉपस्टार रिहानाने ट्विट केले होते. त्यानंतर ग्रेटा थनबर्गने टुलकिट चुकीने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या गोष्टींचा उलगडा झाला. नोव्हेंबर २०२० पासून भारताविरूद्ध षडयंत्र रचण्यास सुरुवात झाली होती, अशी माहिती त्यात होती. त्यानंतर देशातील अनेक सेलिब्रिटींनी या षडयंत्राविरोधात एकत्र येत विरोध केला होता. यात सचिन तेंडूलकर, कंगना रणावत, लता मंगेशकर, अक्षय कुमार यांचा समावेश होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.