शिवभक्तांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, पाह फोटो

0
नाशिक : शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी  नाशिक शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे त्यांनी उदघाटन केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नानासाहेब महाले, दिलीप खैरे,बाळासाहेब कर्डक, नगरसेवक गजानन शेलार, गुरुमित बग्गा, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, नाशिक महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, पंचवटी शिवजयंतीचे अध्यक्ष मामा राजवाडे,चेतन शेलार, शंकर मोकळ,सचिन पिंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.