Breaking : मंत्रिमंडळात होणार खांदेपालट, गृहमंत्री अनिल देशमुखांची विकेट पडणार?

सचिन वाझे प्रकरण भोवणार, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बोलावली बैठक

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून सातत्याने महाविकास आघाडी सरकारला लक्ष केले जात आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच मुबंईत मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी सापडलेल्या कार प्रकरणी सचिन वाझे प्रकरण समोर आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या एकुण काय पद्धतीवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागल्याने, आता मंत्रिमंडळ आवश्यक ते बदल केले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांची विकेट पडण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चेदरम्यान, राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची खाते बदलण्याबाबतची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार यांनी सकाळीच वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर सचिन वाझे प्रकरणाबाबतही माहिती घेतली. सध्या सचिन वाझे प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारला चांगलेच अडचणीत आणले जात आहेत. याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागल्याने हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता आहे. अशात मंत्रिमंडळात योग्य ते खांदेपालट करून या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांकडून केला जाऊ शकतो.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुवातीपासूनच काही मंत्र्यांच्या विभागांमध्ये योग्य ते बदल करायचे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्र्यांनाही खातेबदलांबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्या मंत्र्यांची गच्छंती होणार अन्‌ कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे. पुढच्या काही दिवसातच याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित असल्याची माहितीही समोर येत आहे.

दरम्यान, गेल्या काही प्रकरणामुळे महाविकास आघाडी विशेषत: राष्ट्रवावादी काँग्रेस बॅकफुटवर आल्याचे दिसून आले. कारण गृहखातं राष्ट्रवादीकडे असल्याने, त्यांचे यावर नियंत्रण नसल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे. या सर्व राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादींच्या मंत्र्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. बैठकीत सचिन वाझे, धनंजय मुंडे, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.