तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा रेखा जरे हत्याकाडातील सूत्रधार बाळ बोठे अखेर जेरबंद

बोठे ज्या रूममध्ये राहत होता, त्या रूमच्या बाहेरून कुलूप लावले होते

0

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला अखेर पोलिसांना बेळ्या ठोकण्यात यश आले आहे. गेल्या तीन महिन्यापासून फरार असलेल्या बोठेला हैद्राबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे. बोठे ज्या रूममध्ये थांबलेला होता, त्या रूमला बाहेरून कुलूप लावले होते, अशी माहिती अहमदनगर पोलिसांनी दिली आहे. याबाबत नगरचे पोलीस अधिक्षक यांनी पत्रकार परिषेत घेऊन याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.

गेल्या ३० नोव्हेंबर रोजी रेखा जरी यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणातील पाच मारेकऱ्यांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची जेव्हा कसून चौकशी केली गेली तेव्हा या प्रकरणात मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे समोर आले होते. त्यानेच रेखा जरे यांच्या हेत्येची सुपारी दिल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर बाळ बोठेला अटक करण्यासाठी पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरविले. त्याकरिता पाच पथकेही तैनात करण्यात आले होते.

विविध जिल्ह्यांमध्ये छापे देखील  टाकले होते. परंतु बाळ बोठेला अटक करण्यात पोलिसांना वेळोवेळी अपयश आले. तब्बल तीन महिने बोठेने पोलिसांना गुंगारा दिला. अखेर बोठे हैदराबाद येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीन हैदराबाद गाठत बोठेला बेळ्या ठोकल्या. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोठे ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्या रुमच्या बाहेरून कुलूप लावलेले होते.

मात्र पोलिसांनी मिळालेली माहिती खात्रीशीर असल्याने त्यांनी बोठे बेळ्या ठोकल्या. या अटकेसाठी पोलिसांनी पाच दिवस विशेष ऑपरेशन केले. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक केली आहे. तब्बल १०२ दिवसानंतर पोलिसांनी बाळ बोठेला अटक केली आहे. रेखा जरे आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करतील या कारणातून हत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र हत्ये मागचं नेमकं कारण काय आहे? याचा तपास आता पोलिस करत आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.