काकांनी ३-४ वर्षे माझ्यावर बलात्कार केला; वैश्याव्यवसायही केला; Bigg Boss फेम रोहित वर्माचे धक्कादायक खुलासे!

प्रियकराला शोधण्यासाठी गेलो असता, तो मुलींबरोबर कारमध्ये सेक्स करत होता

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा

बिग बॉस फेम फॅशन डिझायनर रोहित वर्मा याने राष्ट्रीय टेलिव्हिजनवर आयुष्याशी संबंधित काही धक्कादायक खुलासे केले आहेत. रोहितचे नाते बॉलिवूड कलाकारांशी आहे. मुलाखतीत रोहितने आयुष्याशी संबंधित वादांवर खुलेपणाने भाष्य केले. लहानपणी जवळच्या मित्रांनी ३-४ वर्षे त्याचे लैंगिक शोषण केले. स्वत:वर कास्टिंग काउचचा आरोप तसेच वेश्याव्यवसायातून पैसे कमवून डिझायनिंगच्या वस्तू कशा विकत घेतल्या, यावर तो बोलला.

सिद्धार्थ काननने रोहितला शोमध्ये विचारले की, तो पुरुष कलाकारांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे का? ते लोक उघडपणे समलिंगी, उभयलिंगी आहेत असे म्हणतात का? यावर रोहितने उत्तर दिले, ‘माझा विश्वास आहे की प्रत्येकजण उभयलिंगी आहे. काही लोक त्याबद्दल उघडपणे बोलतात तर काही उघडपणे बोलत नाहीत. मी रिलेशनशिपमध्ये आहे. मी ते नाकारणार नाही. काही लोक हे लपूनछपून करतात. मी उघडपणे बोलण्याची मोठी किंमत मोजली आहे.’

अनेक मोठ्या स्टार्ससोबत अनेक महिन्यांपासून संबंध आहेत. लिव्ह इनमध्ये राहीला आहे. एकदा तो प्रियकरासाठी करवा चौथचा उपवास करीत होता. तो आला नाही तर शोधण्यासाठी डिस्कोमध्ये गेलाे. कार पार्किंगमध्ये पाहिले असता तो कारमध्ये मुलीसोबत सेक्स करीत होता. शांतपणे घरी आलो. पहाटे चारच्या सुमारास अभिनेता परत आला. विचारले असता शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले, असेही रोहितने सांगितले.

रोहितने वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याबद्दलही सांगितले. मी चांगल्या कुटुंबातील आहे. कुटुंबातील सदस्य जुन्या विचारांचे आहेत. काकांनी माझ्यावर बलात्कार केला. त्यावेळी मी ८ वर्षांचा होताे. हे ३-४ वर्षे चालले. भीतीमुळे आई-वडिलांना सांगू शकलो नाही, असेही रोहितने सांगितले.

मुंबईत आलो तेव्हा पैशांची गरज होती. मुलींसारखे कपडे घालून ताजभोवती फिरत राहत होतो. लोकांनी एक-दोनदा नेले. यातून मिळालेल्या पैशातून डिझायनिंगचे सामान घेतले. याचा कोणताही पश्चात्ताप नाही. कारण, असे करायचे होते म्हणून केले. कोणीही जबरदस्ती केली नव्हती, असेही रोहित म्हणाला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.