भास्कर जाधव कधी तोंड उघडतात त्याची वाटच बघतोय; रामदास कदमांचे भास्कर जाधवांना आव्हान!

भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना कृतघ्न असं म्हटलं होतं

0

रत्नागिरी : लोकराष्ट्र वृत्तसेवा

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टीका करत आहे. दसरा मेळाव्यावरूनही त्यांनी ठाकरेंना धारेवर धरले. यानंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. रामदास कदम यांच्यासारखा कृतघ्न माणूस मी कधीही बघितला नाही, अशी टीका भास्कर जाधवांनी केली. याला रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी वाट बघतोय, भास्कर जाधव कधी तोंड उघडतात ते, असं म्हणत कदम यांनी जाधवांना आव्हान केले.

मी बेईमान आहे, कृतघ्न आहे, असे आरोप त्यांनी माझ्यावर केले आहेत. मी जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाषण केले, तेव्हा उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मांडीवर बसले नव्हते, अशा शब्दांत कदम यांनी टोला लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला आहे. मला तुमच्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत त्यांनी भास्कर जाधव यांना कदम यांनी खडेबोल सुनावले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.