राज ठाकरे चोरंगी चिरा… सुरेखा पुणेकर संतापल्या

शरद पवारांवर टीका करताना विचार करावा, असेही त्या म्हणाल्या

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

नारायण गाव/पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. या सभेत त्यांनी भोंग्यांचा विषय पुन्हा एकदा आक्रमकपणे मांडला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही पुन्हा एकदा सडकून टीका केली. आता यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक सरचिटणीस सुरेखा पुणेकर यांनी राज यांच्यावर टीका केली आहे.

READ ALSO : शरद पवारांना हिंदू शब्दाचीच ॲलर्जी, त्यांच्या तोंडून कधीच शिवाजी महाराजांचे नाव ऐकले नाही; राज ठाकरेंची सडकून टीका!

सुरेखा पुणेकर म्हणाल्या की, ‘‘राज ठाकरे हे चोरंगी चिरा असून त्यांनी जातीपातीचे राजकारण करणे बंद करावे. तसेच शरद पवारांवर टीका करताना त्यांनी विचार करूनच बोलायला हवे. देशात सर्वप्रथम महिला धोरण आणण्यासाठी शरद पवारांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे महिला विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. तसेच मोठमोठ्या पदांवर महिला आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. शरद पवारांनी जातीभेदभाव कधीच केला नाही. सर्व जाती धर्मांच्या लोकांसोबत त्यांनी काम केले आहे, असे पुणेकर म्हणाल्या.

READ ALSO : व्वा राजसाहेब व्वा… राज ठाकरेंच्या भाषणावर अभिनेता शरद पोंक्षेची प्रतिक्रिया

राज ठाकरे आपल्या भाषणाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोंग्याचा विषय काढून मदतारांना असे दुखावणार असाल तर कोण तुमच्यासोबत येणार, असा सवाल सुरेखा पुणेकर यांनी केला आहे. राज ठाकरे मोठे नेते असून त्यांनी स्वतःची प्रतिमा खराब करू नये, असेही त्या म्हणाल्या. राज यांच्यावर विशेषत मुस्लीम समाज नाराज आहे. तेव्हा असे राजकारण करू नका, असे पुणेकर म्हणाल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.