राहुल गांधींच्या पायगुणामुळेच पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार पडलं, भाजपच्या ‘या’ नेत्याने केली टीका!

पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार पडल्याने मोठा धक्का मानला जात आहे

0

पुद्दुचेरी : बहुमत सिद्ध करण्यास मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना अपयश आल्याने पद्दुचेरी येथील काँग्रेसचं सरकार पडलं आहे. गेल्या दिवसांपासून पुद्दुचेरीमध्ये राजकीय घटनांना वेग आला होता. राज्यपाल किरण बेदी यांना पदावरून काढल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना आणखीनच वेग आला होता. अशात दोन आमदारांनी राजीनामा दिल्याने, सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे काँग्रेसने बहुमत सिद्ध करणे गरजेचे होते. त्यानुसार जेव्हा व्ही. नारायणसामी यांचे सरकार सोमवारी बहुमताला सोमोरे गेले तेव्हा त्यात त्यांना अपयश आले व सरकार पडले. काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी पुद्दुचेरीत जे काही सुरू आहे, तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केली होती. तसेच भाजपनेच हा सर्व डाव खेळल्याचा आरोपही केला होता. आता भाजपकडून यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

READ ALSO : हा तर राजकीय वेश्याव्यवसाय, व्ही नारायणसामी यांची घणघाती टीका!

READ ALSO : अखेर पुद्दुचेरीत काँग्रेसचं सरकार कोसळलं, बहुमत सिद्ध करण्यात अपयश!

भाजपाचे नेते आणि आयटी सेलचे राष्ट्रीय प्रमुख असणाऱ्या अमित मालवीय यांनी काँग्रेसला बहुतम सिद्ध न करता आल्यामुळेच काँग्रेसला पायउतार व्हावे लागल्याबाबतची टीका केला आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनाही टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, राहुल गांधी पुद्दुचेरीला गेले आणि त्यांनी त्यांच्या मिडास टचमुळे या केंद्रशासित प्रदेशामधील काँग्रेसचं सरकार पाडलं.

दरम्यान, काँग्रेस आणि द्रुमुकच्या प्रत्येकी एका आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारूढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरले होते. तर विरोधकांकडे १४ सदस्यांची आघाडी होती. तर सात जागा रिक्त आहेत. दरम्यान, हेही राज्य गेल्यामुळे काँग्रेसकडे आता केवळ पंजाब आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये एकहाती सत्ता आहे. तर राजस्थान, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काँग्रेस युतीमध्ये सत्तेत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.