Photo : प्रियांका चोप्राच्या रेड ड्रेसमधील अदांनी चाहते घायाळ, स्पेसमॅन फोटोशूट होतेय व्हायरल!

0

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच तिने स्पेसमॅनच्या प्रमोशनसाठी फोटोशूट केले असून, सध्या तिचे हे फोटोशूट वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये प्रियांकाचा अंदाज खूपच हॉट असून, तिचा पती निक जोनाससोबतचा तिचा एक फोटोही त्यात बघावयास मिळत आहे. फोटोमध्ये दोघांची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. वास्तविक प्रियंका नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. कधी फोटो तर कधी व्हिडीओ ती शेअर करीत असते. आता प्रियांकाचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.

काही दिवसांपुर्वी प्रियांका तिच्या बलून ड्रेसमुळे चर्चेत आली होती. आता प्रियांका तिच्या रेड हॉट ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. प्रियांकाने ऑल-रेड बालेन्सिगा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये प्रियांका हॉट दिसत आहे. लाल रंगाची प्रियांकाची लिपस्टिक सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. प्रियांका कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर दिसत आहे. हे फोटो शेअर करत प्रियांकाने स्पेसमॅन असे कॅप्शन दिले आहे. तर तिने पती निक जोनसला देखील टॅग केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.