पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हात जोडून केली कळकळीची विनंती, पाहा व्हिडीओ!

कृषी कायद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सर्वांना विनंती केली आहे

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले तीन्ही कृषी कायदे रद्द केले जावेत यासाठी गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र केंद्र सरकारने सुरुवातीपासूनच ‘तेवढं सोडून बोला’ अशी भूमिका घेतल्याने हे आंदोलन चिघळताना दिसत आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्याने केंद्र सरकारवर दबाव वाढत आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसह सर्वांना हात जोडून एक विनंती करणारे ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये म्हटले की, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत या तिन्ही कृषी कायद्यासंदर्भात सर्व प्रकारच्या शंकांचे निरसन करणारे भाषण केले आहे. मी आपणास नम्रपणे विनंती करतो की, आपण हे भाषण आपण नक्की ऐकावे. पंतप्रधानांच्या या ट्विटचा शेतकऱ्यांवर परिणाम होणार याची शक्यता कमीच वर्तविली जात आहे. मात्र त्यांचे हे ट्विट सध्या सर्वत्र चर्चिले जात आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.