Photos : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष सैन्यासह रणांगणात; कोणत्याही किंमतीत झुकणार नाही, रशियाला ठणकावलं!

आपल्या सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष सैन्याच्या पोशाखात मैदानात उतरले

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा

रशियाने युक्रेनसोबतच्या युद्धात आघाडी घेत युक्रेनमधील बहुतांश शहरांमध्ये हवाईहल्ले सुरू केले आहेत. सध्या या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती असून, नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.

गुरुवारी युद्धाचा पहिला दिवस असला तरी, पुढच्या काही दिवसांमध्ये या दोन देशात काय परिस्थिती निर्माण होईल, हे तुर्तास सांगणे अवघड आहे.

कारण रशियाने युक्रेनला चारही बाजुने वेढा दिला असून, रशियाकडून झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर रशियाच्या लष्काराने युक्रेनमध्ये सर्वत्र स्फोट करण्यास सुरुवात केली आहे.

युक्रेनची राजधानी कीवमध्ये जागोजागी स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत.

त्याचबरोबर युक्रेनचे तिसरे मोठे शहर असलेल्या केमटोर्स्क आणि ओडेसा येथेही स्फोटाचे मोठमोठे आवाज ऐकायला मिळत आहेत. या युद्धजन्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती स्वत: रणांगणात उतरले आहेत.

सैन्याच्या वेशातील युक्रेनच्या राष्ट्रध्यक्षांचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी कुठल्याही किंमतीवर झुकणार नसल्याची भूमिका घेतल्याने, युक्रेननेही रशियन सैन्याला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

रशियासारख्या बलाढ्य देशासमोर युक्रेन ताकदीने उभा असल्यानेही जगभरातून त्याचा कौतुक केले जात आहे.

दरम्यान, आपल्या सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी राष्ट्राध्यक्षांनी स्वत: सैन्याच्या पोशाखात मैदानावर उडी घेतली. आपल्या सैन्यांशी चर्चा केली.

रशियाने ज्या ठिकाणी हल्ले केले त्याच ठिकाणी युक्रेनेचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी भेट दिली. याबाबतचे त्यांची काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्होदिमर झेलंस्की सैन्याच्या वेशात दिसत आहेत. व्होदिमर झेलंस्की यांनी सैन्याची कपडे परिधान केली आहेत.

सैन्यासोबत परिस्तितीचा आढावा घेतना ते दिसत आहेत. व्होदिमर झेलंस्की यांनी आपल्या सैन्याचं मनोबल वाढवले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.