पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, ‘या’ कारणाने झाला मृत्यू!

0

पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या मृत्यूचे गुढ वाढत असताना तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त झाला आहे. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने, पूजाच्या मृत्यूचे नेमके कारण काय? याबाबतचा सखोल तपास केला जावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडून केली जात आहे. दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनी संजय राठोड यांच्यावरच गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी केली जात असल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळत आहे. 

READ ALSO : पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली प्रथमच प्रतिक्रिया

दरम्यान, या सर्व घडामोडीमध्ये पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट समोर आला असून, त्यामध्ये तिचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला आहे. याबाबतची माहिती दिली. या रिपोर्टनुसार पूजाचा मृत्यू डोक्याला मार लागून झाला आहे. याबाबतची सविस्तर माहिती वानवाडी पोलीस ठाण्यचो वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी दिली आहे. ते म्हणाले की, पोस्टमॉर्टम अहवालात पुजाचा मृत्यू डोक्याला मार लागून झाला आहे.  त्याचबरोबर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पाचारण केलं असून, दीपक लगड यांच्याकडून हेमंत नगराळे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आहे.

READ ALSO : पूजा चव्हाण आत्महत्या नसून हत्याच : चित्रा वाघ

दरम्यान, पूजा चव्हाणने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तिच्या डोक्याला आणि मनक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. पुजाचे बीएचं शिक्षण पूर्ण झालं होतं. पुजा तिच्या चुलत भाऊ आणि एका मित्रासोबत पुण्यात राहत होती. पुण्यात ती स्पोकन इंग्लिशच्या कोर्ससाठी आली होती. पुण्यात येऊन दोनच आठवडे झाले होते तोच तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.