देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांच्यासह ‘या’ भाजप नेत्यांविरोधात राठोडांची पोलिसात तक्रार

भाजपचे नेते बदनामी करीत असल्याचा केला आरोप

0

वाशिम : पूजा चव्हाण आत्महत्या  (Pooja Chavan Suicide)  प्रकरणी पोलिसांचा योग्य दिशेने तपास सुरू असताना भाजपचे काही लोक विनाकारण बंजारा समाजाची बदनामी करीत आहेत. या सर्वांवर कारवाई केली जावी अशा मागणीची तक्रार राष्ट्रीय बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम सरदार राठोड यांनी मानोरा पोलीस ठाण्यात दिली आहे.

हेही वाचा : पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले, धक्कादायक खुलासा!

राठोड यांनी तक्रारीत नमूद केले की, बंजारा समाजाची असलेल्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली, ही बाब नक्कीच खेदाची आहे. त्याचे आम्हालाही दु:ख झाले आहे. त्यामुळे तिच्या आत्महत्येला जो कोणी जबाबदार असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास योग्यपद्धतीने सुरू आहे. मात्र अशातही भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, प्रसाद लाड आदी मंडळी बंजारा समाजाची तसेच पूजा चव्हाणच्या कुटुबियांची बदनामी करीत आहेत.

हेही वाचा : अखेर विकेट पडली, संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

त्याचबरोबर वायफळ व्यक्तव्य करून पोलिसांच्या तपासातही अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यामुळे या सर्व संबंधित नेते व मीडियावर तातडीने कारवाई केली जावी, अन्यथा राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे आंदोनल करू, असा इशारा तक्रारीत दिला आहे. मानोरा पोलिसांनी ही तक्रार तपासात ठेवली असून, वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले आहे, असे ठाणेदार शिशिर मानकर यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.