मुख्य आरोपीची चौकशी न करताच अहवाल कसा काय बनू शकतो? चित्रा वाघ यांचा पोलिसांवर निशाणा!

0

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला अजूनही पोलिसांकडून हवी तशी कारवाई केली जात नसल्याने विरोधकांकडून सातत्याने पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नुकताच पोलिस महासंचालकांनी या प्रकरणाबाबतचा सविस्तर अहवाल राज्य सरकार व महिला आयोगाकडे पाठविला आहे. मात्र यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी एक ट्विट शेअर करीत पोलिसांच्या या अहवालावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपीची चौकशी न करता अहवाल सादर केलाच कसा?  यावेळी चित्रा वाघ यांनी व्हिडीओ शेअर करून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यापासून भाजपकडून त्यांच्यावर कारवाईची सातत्याने मागणी केली जात आहे. त्यातच सुरुवातीपासूनच भाजप नेत्या चित्रा वाघ या प्रकरणाचा पाठपुरावा करीत असल्याने, त्यांनी संजय राठोड यांच्यावर पोलीस का कारवाई करीत नाहीत? असा सवाल वारंवार उपस्थित केला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले की, ‘सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की, ज्या १२ ऑडीओ क्लिप आहेत, ज्यामध्ये संजय राठोड ज्या दोन कथित मुलांना, ज्यामध्ये एकाचे नावे अरुण राठोड आणि दुसरा विलास अशी आहेत.  त्यांच्याशी केलेल्या संभाषनामध्ये आत्महत्येला परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर ‘दरवाजा तोड पण मोबाईल घे’ इतपर्यंतचे संभाषण आहे. मात्र अशातही संजय राठोड यांची चौकशी न करता पोलिस अहवाल कसा काय बनवू शकतात. त्यामुळे जो काही चौकशी अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे, त्याला काहीही अर्थ नाही.

दरम्यान पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की, मुख्य आरोपी जो आहे त्याची चौकशीचं झाली नाही किंबहुना तो बेपत्ता आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत आहे की, सत्ताधारी पक्षातील मोठे मोठे नेते सांगत आहेत की, संजय राठोड आमच्या संपर्कात आहे. परंतु तुमच्या संपर्कात राहून काय करायचं त्यांनी जनतेच्या संपर्कात राहील पाहिजे. मात्र, ते तर बेपत्ता आहेत. सर्वजण शोधत आहेत, परंतु कुठेच संजय राठोड मिळून येत नाही आणि जर तुमच्या संपर्कात असतील तर तुम्हीच त्यांना संपर्कात ठेवणार का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामध्ये प्रत्येक नेता असं सांगतो की, ते निर्दोष आहेत. जर ते निर्दोष असतील तर त्यांनी समोर येऊन सांगावं असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.