पूजा चव्हाण आत्महत्या नसून हत्याच – चित्रा वाघ

0

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात दररोज नवेनवे खुलासे समोर येत असल्याने ही आत्महत्या की हत्या असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी तर ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचे म्हटले आहे. तसेच याबाबतच्या बऱ्याच अपडेट्‌स गेल्या दोन दिवसात आपणा सर्वांसमोर आल्याचे म्हटले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात जवळपास १० ते ११ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. त्याचबरोबर बरेचसे फोटोज समोर आले आहेत. त्या ऑडिओ क्लिप्समधून तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्यापासून तिची आत्महत्या झाल्यानंतर तिचा दरवाजा तोड पण मोबाइल ताब्यात घे असे सांगताना मंत्री संजय राठोड त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगताना ऐकवायास मिळत आहेत. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

त्याचबरोबर पोलिसांनी याबाबत स्वत:हून तक्रार दाखल करायला हवी. या सर्व ऑडिओ क्लिप्स, फोटोजचा गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या यांचा तेट रोख हा शिवेसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे,अशी भूमिकाही चित्रा वाघ यांनी घेतली आहे.

READ ALSO : पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली प्रथमच प्रतिक्रिया

दरम्यान, या प्रकरणी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सरकारमधील डझनभर मंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्याने पोलिस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांकडून कारवाईसाठी दबाव वाढत असल्याने संजय राठोड यांचे मंत्रिपदही धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.