Politics News : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पाण्याला अशुद्ध म्हटल्यानंतर फडणवीसांच्या भाजप आमदारांने राज ठाकरेंना दिलं उत्तर.. म्हणाले, ‘ मी स्वतः….’

Politics News – लोकराष्ट्र (Ram Kadam) : पिंपरी चिंचवड मध्ये मनसेचा रविवारी ( दि. 9 ) 19 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने आयोजित मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील स्नानामुळे झालेल्या अशुद्ध पाण्याची खिल्ली उडवली ते म्हणाले,’ गंगा स्वच्छ होणार हे राजीव गांधी असल्यापासून ऐकत आहे पण ती काही स्वच्छ होत नाही. बाळा नांदगावकर देखील छोट्याशा कमंडलू मधून गंगेचे पाणी घेऊन आले . मी म्हटलं हड,’मी पाणी पिणार नाही.’

या वक्तव्यावरच भाजपचे आमदार राम कदम यांनी उत्तर दिल आहे ते म्हणाले, मी स्वतः तीन वेळा कुंभमेळ्यात स्नान केला आहे.ते पाणी स्वच्छ आहे. अनेक व्यक्ती,नेते,अभिनेते,उद्योगपती, साधुसंत तिथे स्नानासाठी जातात. ‘जे तिथे गेलेच नाहीत त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असल्याचे म्हणणे योग्य नाही.’राम कदम म्हणाले, कुंभमेळा मध्ये स्नान करणे हा श्रद्धेचा सन्मान आहे आणि तो सर्वांनीच राखला पाहिजे. कुंभमेळ्यात 45 दिवसात 65 कोटी लोकांनी पवित्र स्नानाचा लाभ घेतला. मोदी सरकार नद्या स्वच्छ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गंगा नदी मध्ये पूर्वी कारखान्यांच्या आणि गटारीचे पाणी मिसळत होते पण आता त्यावर नियंत्रण आणले जात आहे. गंगा पूर्णपणे स्वच्छ होण्याच्या दिशेने सरकार कार्यरत आहे असे देखील ते म्हणाले.

Leave a Comment