कृषी कायदे रद्द करा, पण मुळ मुद्यावर कोणी बोलत नाही, पंतप्रधानांनी सोडले मौन!

राज्यसभेत पंतप्रधानांचे भाषण सुरू

0

नवी दिल्ली : ‘सभागृहात शेतकरी आंदोलनावर खूप चर्चा. विरोधक मूळ मुद्यावर गप्प आहेत. जास्तीज जास्त वेळी जे मुद्दे मांडले गेले, ते आंदोलनाचे आहे. पण, कोणत्या गोष्टीसाठी आंदोलन आहे, यावर मात्र सर्वजण गप्प आहेत. कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी आहेत. पण, मूळ मुद्यांवर चर्चा झाली असती, तर चांगलं झालं असतं. कृषीमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, याची मला खात्री आहे.’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यावर बोलताना मौन सोडले.

गेल्या दोन महिन्यांपासून राजधानी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीवर अखेर पंतप्रधानांनी मौन सोडले आहे. नवे कृषी कायदे रद्द करा या शेतकऱ्यांच्या मागणीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे बघतात, याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. त्यांनी राज्यसभेत बोलताना कृषी कायद्यांवर बोलताना मुळ मुद्यावर चर्चा झाली नसल्याचे म्हटले. तसेच विरोधकांकडून विनाकारण शेतकऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही सांगितले.

यावेळी त्यांनी म्हटले की, संपूर्ण जग सध्या अनेक आव्हानांशी लढत आहे. कुणी असा विचारदेखील केला नसेल की, मानव जातीला अशा कठीण काळातून जावे लागेल. भारत एक युवा देश आहे. भारतातील युवा मन पाहता असे वाटते की, आज भारत एक संधीची भूमी आहे. अनेक संधी आमची प्रतिक्षा करत असल्याचेही त्यांनी याप्रसंगी म्हटले. यावेळी त्यांनी विरोधकांचाही चागंलाच समाचार घेतला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.