…तर मोदी नोटेवरून गांधीजींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे ट्विट

0

मुंबई : देशात कोरोनाची संभाव्य दुसरी लाट आल्याची स्थिती निर्माण होत असतानाच पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांचा ज्वरही चांगलाच चढताना दिसत आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोर धरल्याने, कोरोनाच्या चिंतेबरोबरच वातावरण तापत असताना दिसत आहे. विशेषत: पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये घमासान बघावयास मिळत असून, दोन्ही पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहे. त्यामुळे दररोज नवा वाद निर्माण होत असून, देशातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. आता तृणमूल आणि भाजपच्या या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. तृणमूलने लसीकरण प्रमाणावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप घेत केंद्राकडे टीका केली होती. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीने मोदींना चिमटा काढला आहे.

काही दिवसांपूर्वीच निवडणुक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यातील पेट्रोल पंम्पांवरील होर्डिग्ज काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटोही काढण्याचे निर्देश केंद्री आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत. याचाच आधार घेऊन राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवून दिली आहे. हिंदीमध्ये केलेल्या या ट्विटमध्ये नवाल मलिक यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढे निघून गेले आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर मोदींचेच फोटो आहेत. जिकडे पहावं तिकडे मोदींचेच फोटो दिसतात. खादीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वतःचा फोटो छापला. आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींनी स्वतःचा फोटो लावला आहे. हे असंच चालत राहिलं, तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतः फोटो छापतील, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. 

दरम्यान, याबाबतची माहिती अशी की, सध्या बंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचे छायाचित्र झळकत आहे. मात्र आता त्यास विरोध केला जात आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही नाराजीचा सूर लावला जात आहे. सध्या दुसरी लस दिलेल्यांच्या भ्रमणध्वनीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेल्या यंत्रणेद्वारे एक संदेश येतो. त्यावरील लिंक उघडल्यास प्रमाणपत्रावर लाभार्थ्यांचे नाव, लिंग, ओळख क्रमांक, लसीकरणाची तारीख, कोणती लस दिली याबाबत माहिती दिसते. त्यात ‘दवाई भी और कडाई भी’ या संदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे. हे छायाचित्र बघून वैद्यकीय क्षेत्रात सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारची चर्चा रंगली आहे. आतापर्यंत लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या बीसीजी, त्रिगुणी लस, पोलिओ लस, गोवरसह इतर लशीकरणाच्या नोंदीच्या कागदांवरही कधी कोणत्याही नेत्याचे छायाचित्र नव्हते, अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रात तसेच लाभार्थ्यांमध्ये होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.