शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली नुसताच तमाशा – पाशा पटेल यांची टीका

0

कोल्हापूर : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेततकरी आंदोलनाला पूर्णपणे राजकीय स्वरूप मिळाले आहे. त्यामुळे आंदोलनाच्या नावाखाली नुसताच तमाशा सुरू आहे. अशा शब्दात राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी टिका केली. यावेळी त्यांनी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यावरही टीकेची तोफ डागली. ‘शरद पवार राज्यसभेचे सदस्य आहेतत. राज्यसभेमध्ये शेतकरी कायद्यावर चर्चा केली गेली. मग तेव्हा शरद पवार कुठे होते? ते राज्यसभेत नवव्हते काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी अशाप्रकारची टीका केली. ते म्हणाले की, ‘शेतकरी आंदोलनाला दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. सुरुवातीपासूनच केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांची संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या चारपैकी तीन मागण्याही मान्य केल्या. मात्र अशातही विरोध सुरूच आहे. हा विरोध कशासाठी? त्यामागी नेमके गमक काय? हे अजूनही कळाले नाही. या आंदोलनाची वाटचाल बघता शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्यया नावावरून तमाशा करण्यातच अधिक रस असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी त्यांच्या पृथ्वी संरक्षण चळवळीबाबत देखील माहिती दिली. ते म्हणाले की, ही चळवळ घेऊन मी देशभर फिरत आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे खूपच महत्त्वाचे आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुधारित इंजिनाची वाहनं वापरण्याच्या आदेशाचे स्वागत करतो. वातावरण बदलामुळे नुकसान रोखण्यासाठी पिंपळ, वड, उंबर यासारखी पैसे आणि ऑक्सिजन मिळेल अशा झाडांची शेतकऱ्यांनी निवड केली पाहिजे. मांजरा व गोदावरी या नदी लातूर जिल्ह्यातून वाहत असूनही येथे पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी दोन्ही नदीच्या किनारी चार हजार हेक्टर क्षेत्रात वीस हजार बांबूची झाडे लावण्याचा संकल्प केला,” असल्याचं पाशा पटेल यांनी नमूद केलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.