राज्यपालांविरुद्ध शीत नव्हे तर उघड युद्ध – शिवसेना खासदार संजय राऊत

नाशिक दौऱ्यावर संजय राऊत आले असता, त्यांनी पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नांना बिंधास्त उत्तरे दिलीत

0

नाशिक : भाजपा राज्यपालांच्या आडून सरकारला अडचणीत आणण्याचे नाना प्रयत्न करीत आहे. राज्यपालांचा ढालीसारखा वापर भाजपाकडून केला जात आहे. त्यामुळेच राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा प्रश्न अजुनही प्रलंबित आहे. त्यामुळे राज्य शासन आणि राज्यपाल यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र हे शीत युद्ध नसून, उघड युद्ध असल्याचा घाणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला केला आहे. 

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यपालांवर टीका केली. यावेळी पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘राजभवनाकडून सरकारविरोधात काही गोष्टी शिजत आहेत. वेळोवेळी ते उघडही झाले आहे. त्यामुळे राज्यपाल आणि सरकार यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचे बऱ्याच वेळा बोलले गेले. मात्र हे उघड युद्ध आहे. राज्यपालांच्या अशाप्रकारच्या भूमिकेमुळे जनहिताची अनेक कामे रखडली आहे. राज्यपालांनी अगोदर भाजपाच्या भूमिकेतून बाहेर यावे व राज्याचा विचार करावा, असा उपोरोधिक सल्लाही राऊत यांनी राज्यपालांना दिला.

यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांवर बिंधास्त उत्तरे दिलीत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.