कोरोनाचा धोका वाढतोय : नागपूर, मुंबई, नाशिक, अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली

0

मुंबई : सध्या देशात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र लसीकरणानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचीही वस्तुस्थिती आहे. लसीकरण आल्यामुळे लोक गाफील राहत असल्याने कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यात आहे. गुरुवारी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील नागपूर, मुंबई, अकोला आणि नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. नागपूरात तर तब्बल ५०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांनी नोंद झाली. त्यापैकी ४४५ रुग्ण हे शहरातील आहेत.  हीच स्थिती मुंबई, नाशिक आणि अकोला शहरातील असल्याने कोरोनाचा धोका वाढतोय, असेच काहीसे दिसत आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी, राज्यात पुन्हा लॉकडाउनचा विचार नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्यमंत्री जालन्यात बोलत होते. तसेच राज्याचा कोरोनाचा आलेख स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले.  लसीकरणानंतरही राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र याबाबत कोरोनाच्या नियमांचे पालन करणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कुठेच लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही किंवा त्याचा संबंध देखील नाही अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसातून दिवसाला जिल्ह्यात १५० किंवा त्यापेक्षा कमी रुग्ण आढळून येत होते. मात्र शुक्रवारी हाच आकडा ३०० पार गेला. हीच स्थिती अकोल्यात असल्याचे दिसून आले. तर मुंबईत लोकलसह सर्व सेवा सुरू केल्याने तिथेही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तकता बाळगणे हाच एकमेव उपाय आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.