अमरावती, यवतमाळ, साताऱ्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन?, आरोग्य विभागाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण!

0

लोकराष्ट्र : राज्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असून, अमरावती, यवतमाळ, सातारा आणि त्यापाठोपाठ पुणे या शहरांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहे. दक्षिण आफ्रिकेत व इतर देशांमध्ये धुमाकूळ घालणारा कोरोनाचा हा स्ट्रेन भारतातही दाखल झाल्याच्या चर्चा समोर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र यावर आरोग्य विभागाने, या भागातील कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झाले आहेत काय? याबाबतची पाहणी केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आतापर्यंत अमरावती, यवतमाळ, सातारा या जिल्ह्यांमधील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तपासण्यातआले आहेत. या नमुन्यांचे तपासणीचा अहवाल समोर आला असून, त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत ज्या काही गोष्टी समोर येत आहेत, त्यामध्ये अद्याप तरी कुठलीही तथ्यता नसल्याचेच दिसून येत आहे.

पुण्यातील १२ नमुने देखील याच वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले आहेत. त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत. या अनुषंगाने अधिक तपासणी सुरू असून अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील आणखी काही नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था, पुणे या ठिकाणी जनुकीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.