शिवजयंतीनिमित्त दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील दोन महिने अभ्यासवर्ग

धम्मगिरीचा स्तृत्य उपक्रम; तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन

0

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सर्वत्र उत्साह बघावयास मिळत आहे. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने शिवजयंती महोत्सव साजरा करीत आहे. धम्मगिरी सामाजिक व सांस्कृतिक संस्था आणि जीवक फाउंडेशनने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील दोन महिने गणित व इंग्रजी विषयाचे मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देत महाराजांना मानाचा मजुरा घातला आहे.

 

कोरोना संकटात इतर क्षेत्राप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रही भरडून निघाले असून, त्यात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दहावी, बारावीच्या विशेषत: झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने, त्यांची मोठी कसोटी लागत आहे. या विद्यार्थ्यांसाठी पुढील मार्च महिना अत्यंत महत्त्वाचा असल्यानेच हा स्तृत्य उपक्रम राबविला जाणार आहे. राजीवनगर झोपडपट्टीतील राजगृह बुद्धविहारात दररोज दोन तास गणित आणि इंग्रजी विषयावर प्रा. विलास लोखंडे, प्रा. मनोज दिंडे, प्रा. अभिजित इंगळे, प्रा. राजेश बडोगे, प्रा. चौधरी या अनुभवी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. आतापर्यंत २५ विद्यार्थ्यांची या उपक्रमाला नोंदणी करण्यात आली आहे.

शिवजयंती महाेत्सवानिमित्त आयोजित या उपक्रमाचे उद‌घाटन सकाळी १० वाजता राजगृह बुद्धविहार येथे करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. पल्लवी जाधव, डॉ. विशाल जाधव, प्रा. प्रमिला पवार, प्रा. शिवाजी खोपे, डॉ. संजय जाधव, परशुराम जाधव, धोंडीराम आव्हाड, सुनील पारवे, प्रा. लक्ष्मीकांत कावळे, रवींद्र सुरवसे आदी उपस्थित होते. या उपक्रमाची समन्वयक म्हणून युवराज बावा यांच्यावर जबाबदारी असेल.  तर मधुकर गायकवाड, सनी वाघमारे, कल्याण खरात, रावसाहेब मकासरे, गणेश तुपसुंदर, सिताराम मोरे, सुनील पारवे, सुभषा हिवाळे, ज्ञानेश्वर तुपसुंदर, बाळासाहेब गाडे, मधुकर भवाळे, महादेव लोखंडे आदींचे सहकार्य लाभले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.