सुटका, मिरवणूक अन्‌ अटक; पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणेच्या जंगी स्वागताचा असाही समारोप!

0

पुणे : खुनाच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुंड गजानन मारणे याला आपल्या पंटरच्या अतिउत्साहाचा चांगलाच फटका बसला. खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटल्यानंतर त्याच्या अतिउत्साही पंटरनी चक्क त्याची पुण्याच्या रस्त्यावर मिरवणूक काढली. तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत काढलेल्या या जंगी मिरवणुकीची महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली. मात्र त्याचा हा आनंद पोलिसांनी फार काळ टिकू दिला नाही. मिरवणुक काढल्याप्रकरण कोथरूड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करीत पुन्हा त्याला अटक केली. त्यामुळे त्याचा हा प्रवास ‘सुटका, मिवणूक अन्‌ पुन्हा अटक’ असा ठरला. दरम्यान, त्याच्या या थाटामाटात सहभागी असणाऱ्या त्याच्या पंटरचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. 

पुण्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सध्या पोलिसांनी कठोर कारवाईचा धडका लावला आहे. त्यातच गज्या मारणे याने अतिउत्साहीपणा दाखविल्यामुळे आता तो देखील पोलिसांच्या रडारवर आहे. मारणेवर अमोल बधे, पप्पू गावडे आणि आणखी एकाचा खुन केल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हा त्याचा मुक्कमा तळोजा कारागृहात होता. मात्र या खूनातून तो निर्दोष सुटल्यानंतर तळोजा कारागृहातून बाहेर आला. मात्र त्याच्या स्वागतासाठी ३०० पेक्षा अधिक चारचाकी वाहने घेऊन त्याचे पंटर हजर होते. त्याने पुण्याच्या रस्त्यावर त्याची मिरवणूक काढली. कारागृहापासून थेट पुण्यापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने गाड्यांचा ताफा घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घोळक्यात मारणे पुण्यात पोहचला.

मात्र त्याच्या या जंगी मिरवणुकीचा व्हिडीओ असा काही व्हायरल झाला की, संबंध महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. त्याच्यावर गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी केली जाऊ लागली. अखेर मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास कोथरूड पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाई केली जावी असे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दुपारीच दिले होते. तसेच अशाप्रकारे मिवरणूक काढणे पूर्णत: चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.