‘मी पुन्हा येईन’ वरून एकनाथ खडसेंच्या देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळ्या, वाचा काय म्हणाले एकनाथ खडसे!

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत त्यांनी भाजपा अन्‌ देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला.

0

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू आहे. आगामी दिवसात जयंत पाटील संवाद यात्रेसाठी जळगावमध्ये जाणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. 

एकनाथ खडसे यांनी या बैठकीदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लागवला. आता राज्यातील राजकारण बदलत आहे. हे सरकार पडणार, असे विरोधकांना कितीही वाटत असले तरी तसे होणार नाही. हे सरकार टिकणार आहे. महाविकास आघाडी सरकारची पाच वर्षे अशीच निघून जाणार आहेत, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

तसेच भाजपाला पुन्हा येईन, पुन्हा येईन असे म्हणत बसावे लागणार असल्याचचे सांगत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे. त्याचप्रमाणे पुन्हा येईन म्हणणाऱ्यांच्या अहमपणामुळेच राज्यातील भाजपाची सत्ता गेल्याचा दावा देखील खडसे यांनी या बैठकीत केला आहे.

खडसे पुढे म्हणाले की, कोण चांगले काम करत आहे, कोण वाईट काम करत आहे, याकडे जनतेचे लक्ष असते. म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार कसा होईल, यादृष्टीनने प्रयत्न करायला हवेत. कोण काय म्हणतो, याकडे दुर्लक्ष करा, टीका टिप्पणी होतच राहणार आहे. त्याकहे लक्ष देण्याची गरज नाही, असेही खडसे यांनी यावेळी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.