जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटीव्ह

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने तातडीने चाचणी करून घ्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. यावेळी त्यांनी आपली प्रकृती उत्तम असल्याचेही कार्यकर्त्यांना सांगितले आहे. 

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखं काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जंयत पाटील यांनी यावेळी आपण जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. तसेच शासकीय कामकाजांचा आढावा घेतला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.