शिवजन्मोत्सवानिमित्त नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्यावतीने वृद्धाश्रमात फळवाटप व गोशाळेत चारा वाटप

0
नाशिक :  शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने आज नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने मिरवणूक, पोस्टर खर्च यासह इतर खर्चाना फाटा देत सामनगाव येथील वृद्धाश्रमात फळवाटप तसेच गोशाळेत चारा वाटप करत अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व पुतळ्याचे पूजन करत अभिवादन करण्यात आले.

यावेळी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड,  पदाधिकारी महावीर मित्तल,  शंकर धनावडे, संजय राठी, दीपक ढिकले,  सतीश कलंत्री,  किरण आव्हाड,  सुलेमान सय्यद,  सिद्धेश्वर साळुंखे,  अमर नागरे,  विनोद चौधरी,  सोनु शर्मा,  प्रवीण पाटील,  अरविंद पाटील, जे.पी. इंडोरिया यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्टच्यावतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले जात असते. त्यानिमित्ताने शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यास
मिरवणूक काढणे किंवा पोस्टर लावणे यासह अवास्तव खर्च न करता. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजासाठी जे केले आहे. त्याचे स्मरण करून समाजातील गोरगरीब व वंचित घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने सामनगाव जवळील वृढाआश्रमात व अपंगांना फळ वाटप करण्यात आले. तसेच गोशाळेत चारा वाटप करण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.