Nashik Corona Update : १९३ रुग्ण कोरोनामुक्त, १९३ कोरोनाबाधित दाखल

बुधवारी जिल्ह्यात १९३ रुग्ण कोरोनामुक्त तर तितकेच कोरोनाबाधित आढळून आले.

0

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.१०) दिवसभरात १९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नव्याने १९३ बाधित आढळून आले. तर ग्रामीण भागातील दोघा बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात १ हजार १०६ बाधितांवर उपचार सुरू असून, १ हजार ७३ संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे.

शहरात १०२, ग्रामीणला ७६, मालेगावला ९ व परजिल्ह्यात ६ नवीन बाधित आढळून आले आहेत. तसेच शहरातील १२५, ग्रामीण भागात ५९, मालेगावला ५ व परजिल्ह्यातील ४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या १ लाख १७ हजार ३४१ इतकी झाली असून, त्यापैकी १ लाख १४ हजार १७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात २ हजार ६५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ६०४ संशयितांना दाखल करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.