नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणी इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा, वाचा सविस्तर!

पीएचडी नोंदणीसाठी आता पेट चा एकच टप्पा

0

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणी इच्छुक असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘पेट’च्या दोन टप्प्यांमुळे नोंदणी करणाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जात होते. मात्र आता विद्यापीठाने ‘पेट-२’ रद्द केली आहे. त्यामुळे आता केवळ एकाच परिक्षेचे आव्हान राहणार आहे. 

विद्यापीठात पीएच. डीची बजबजपूरी माजल्यामुळे विद्यापीठाने सुरुवातीला ‘पेट’ उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. डॉ. प्रमोद येवले यांच्या प्र. कुलगुरूपदाच्या कार्यकाळात विषयनिहाय ‘पेट-२’ सुरू करण्यात आली आहे. काठिण्यपातळीत वाढ झाल्याने नोंदणीसाठी पात्र ठरणाऱ्यांची संख्या कमी झाली. शिवाय मानव्यशास्त्राच्या उमेदवारांची संख्या बरीच रोडवली. त्यामुळे विधीसभेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. आर. जी. भोयर व डॉ. पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या तयार करण्यात आल्या होत्या. या समितीने पीएच. डी. च्या जाचक अटींमध्ये बदल करीत नव्या शिफारशीचा समावेश केला होता. त्यानुसार विद्यापीठाने शिफारशी मान्य केल्या असून, पीएच. डी. संदर्भात अधिसूचना काढली आहे.

विद्यापीठाने ‘पेट-१’ च्या स्वरूपात बदल केला आहे. रिसर्च मेथडॉलॉजी आणि जनरल ॲप्टिट्यूटवर परीक्षा आधारित असेल. शिवाय ५० प्रश्न हे बहुपर्यायी असतील. मार्च महिन्यात नव्या नियमावलीनुसार पेट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.