धक्कादायक : शेतीच्या वादातून भाऊ, जावायाची हत्या

लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

0

लातून : जिल्ह्यात शेतीच्या वादातून धक्कादायक असा प्रकार घडला आहे. सख्या भावाची व जावायाची शेतीच्या वादातून हत्या करण्यात आली आहे. उदगीर तालुक्यातील हेर येथे घडलेल्या या घडनेमुळे जिल्हा हादरून गेला आहे. घटनेत गोविंद जगताप व नितीन पावडे यांची हत्या करण्यात आली आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास बालाजी जगताप व गोविंद जगताप या सख्ख्या भावांमध्ये शेतीच्या वादातून हाणामारी झाली. यानंतर संशयित आरोपी बालाजी जगताप, अंकुश जगताप, लहू जगताप, पूजा जगताप, अश्विनी जगताप, सोजरबाई ठगे, फुलाबाई जगताप यांनी माजी पोलीस पाटील पंडित पाटील यांच्या सांगण्यावरून मारहाणीचा कट रचला. कुऱ्हाड, तलवार व लोखंडी रॉडने गोविंद जगताप यांना जबर मारहाण केली. त्यांना दुचाकीवरून घेऊन जाणारे त्यांचे जावई नितीन पावडे व भाऊ भगवान जगताप यांनाही मारहाण केली. यात नितीन पावडे हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी गोविंद जगताप यास मृत घोषित केले, तर गंभीर असलेल्या नितीन पावडेला लातूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. डॉक्टरांनी नितीन पावडे यास मृत घोषित केले. मृताची पुतणी जनाबाई बिरादार यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.