पॉर्न फिल्म रॅकेट : लॉकडानमध्ये पॉर्न फिल्मची मागणी वाढल्यानेच सुरू केला गोरखधंदा!

पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

0

मुंबई : सध्या राज्यभर पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरण चांगलेच गाजत आहे. मुंबई पोलिसांनी यामध्ये अनेक बड्या हस्तींचा पर्दाफाश केल्याने, एकच खळबळ उडाली आहे. आणखी बड्या सेलिब्रिटींचे नावे समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांसमोर दररोज नवनवे खुलासे समोर येत असून, या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी मॉडेल-अभिनेत्रीसह एकुण आठ संशयितांना अटक केली आहे. यामध्ये प्रोफेशनल फोटोग्राफर आणि परदेशी प्रोडक्शन कंपनीच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

दरम्यान, पोलिसांनी या संशयितांची कसून चौकशी केली असता, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लॉकडाउन काळात पॉर्न फिल्मची मागणी वाढल्यानेच संशयितांनी मुंबईजवळचे बंगले भाड्यावर घेऊन तिथे पॉर्न फिल्मचा गोरखधंदा सुरू केल्याचे समोर आले आहे. याकरिता त्यांनी चित्रपटसृष्टीत करिअर करू इच्छिणाऱ्यांना जाळ्यात ओढले असून, आतापर्यंत अनेक तरुणींवर पॉर्न फिल्मससाठी दबाव तंत्र वापरल्याचा पोलिसांना अंदाज आहे.

दरम्यान, यासंपूर्ण गोरखधंद्यासाठी अभिनेत्री तथा मॉडेल गहना वशिष्ठने स्वत:च्या प्रॉडक्शन कंपनीची स्थापना केली होती. शॉर्ट फिल्मसच्या नावाखाली ती पॉर्न क्लिप्सची निर्मिती करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी सोमवारी या प्रकरणात उमेश कामत नावाच्या व्यक्तिला अटक केली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्न क्लिप अपलोड करण्यासंबंधी परदेशी प्रोडक्शन हाऊससोबत समन्वय साधण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती, असा आरोप पोलिसांनी केला आहे.

मुंबईमध्ये पॉर्न फिल्मचे चित्रीकरण केल्यानंतर ते परदेशातील सर्व्हरच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्लिप अपलोड करायचे, जेणेकरुन ते कोणाच्या नजरेत येणार नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. ’गहना नवोदीत स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना हेरायची. या कलाकरांना आमिष दाखवून त्यांच्याकडून आपल्या पॉर्न चित्रपटात काम करुन घ्यायची. या नवोदीत कलाकारांना एका पॉर्न चित्रपटात काम करण्याचे १५ ते २० हजार रुपये मिळायचे’ अशी माहिती या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याने दिली. बॉलिवूडचे अन्य लोकही या रॅकेटशी संबंधित आहेत का? त्या अंगाने सुद्धा पोलीस तपास करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.