IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव; बंगळुरूचा दणदणीत विजय!

मुंबई इंडियन्सने १५१ धावांचे आवाहन ठेवले होते

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

यंदाच्या आयपीएलच्या हंगामात मुंबई आणि चेन्नई संघाची घौडदौड सारखीच सुरू आहे. आजच चेन्नई संघाने सलग चौथा सामना गमावला. तिच परिस्थिती मुंबई संघाचीही झाली आहे. यंदाच्या १५ व्या हंगामातील १८ वा सामना बंगळुरू विरुद्ध मुंबई असा खेळला गेला. या सामन्यात बंगळुरू संघाने तब्बल सात गडी राखत दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबईने ठेवलेले १५२ धावांचे आव्हान बंगळुरू संघाने सहज पार केले. ९ चेंडू शिल्लक ठेवत बंगळुरूने हा विजय साजरा केला. बंगळुरूच्या विजयात अनुज रावतची भूमिका महत्त्वाची ठरली.

टॉस जिंकलेल्या बंगळुरू संघाने मुंबई संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुंबईने सावध खेळी करत धावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र सहाव्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्माला माघारी परतावे लागले. त्यानंतर मात्र संघाला गळतीच लागली. सुर्यकुमार यादवचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मैदानावर टीकता आले नाही. सूर्यकुमारच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई संघाने बंगळुरूसमोर १५१ धावांचे लक्ष्य ठेवले.

या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बंगळुरूकडून मैदानात उतरलेल्या फाफ डू प्लेसिस आणि अनूज रावतनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, आठव्या षटकातील पहिल्याच चेंडूत फाफ डू प्लेसिसनं आपली विकेट्स गमावली. त्यानंतर विराट कोहली मैदानात आला. विराट आणि अनुज रावतनं चांगली फलंदाजी करत संघाचा शंभर पार पोहचवला. मात्र, सोळाव्या षटकातील पाचव्या चेंडूत रावत रनआऊट झाला. त्यानं ४७ चेंडूत ६६ धावा केल्या.

त्यानंतर आठराव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीही बाद झाला. त्यानं ३६ चेंडूत ४८ धावा केल्या. दरम्यान, दिनेश कार्तिकनं ७ आणि ग्लेन मॅक्सवेलनं ८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. मुंबईकडून डेवॉल्ड ब्रेविस आणि जयदेव उनादकटनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.