धक्कदायक : १३ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित

0

औंरंगाबाद : महावितरणने मराठवाड्यात तब्बल १३ लाख ९२ हजार ३१३ ग्राहकांचा कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केला आहे. या ग्राहकांकडे १ हजार १२ १ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांना थकबाकीचा भरणा न करताच नवीन वीज पुरवठा दिलेला आहे का, आता याची पाहणी करण्याचे निर्देश महावितरणने कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

वीज बिलाची थकबाकी न भरता त्याच अथवा इतर नावाने, नवीन वीजजोडणी दिल्याचे आढलून आल्यास आणि ससंबंधित ग्राहकांनी थकबाकी न भरल्यास त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांनी दिले आहेत. वीज ग्राहकांना वारंवार सूचना, विनंत्या करूनही थकीत वीज बिल न भरल्यास तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येते. त्यानंतरही वीज ग्राहकाने थकीत वीज बिलाचा भरणा न केल्यास कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येते.

थकबाकीसाठी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ठिकाणी वीज ग्राहकांनी थकबाकीच्या संपूर्ण रकमेचा भरणा करूनच नियमानुसार नवीन वीजजोडणी घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश डॉ. नरेश गीते यांनी दिले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.