महेंद्रसिंग धोनीचा नवा लूक व्हायरल, तुम्ही बघितला काय?

धाेनीच्या संन्यासी लूकची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे

0

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार तथा चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आपल्या लूकसाठी प्रसिद्ध आहे. त्याने वेळोवेळी आपला लूक बदलून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. आता त्याचा नवा संन्यासी लूक सर्वत्र व्हायरल होत असून, सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या चाहत्यांकडून त्याच्या नव्या लूकवर प्रचंड प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अनेकांनी तर त्याच्या या नव्या लुकविषयी त्याचे कौतुकही केले आहे.

वास्तविक धोनीने हा संन्यासी लूक एका जाहिरातीसाठी धारण केले आहे. या लूकमध्ये धोनीने टक्कल केल्याचे दिसत आहे. तसेच तो संन्याश्याच्या वेषात आहे. स्टार स्पोर्ट्‌सने धोनीच्या या संन्यासी लूकमधील काही फोटोज्‌ आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे चाहैत्यांकडून त्यास मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

दरम्यान, धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने धोनी सध्या काय करतो याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. आता त्याचा नवा लूक समोर आल्याने, चाहत्यांनी त्यास चांगलीच पसंती दिली आहे. दरम्यान, धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण करताना लांब केसांची हेअरस्टाइल ठेवली होती. तेव्हा त्याच्या या स्टाइलचे चाहते दिवाणे झाले होते. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिलाच टी-२० वर्ल्डकप जिंकल्याने त्याची ही हेअरलस्टाइल तेव्हा चांगलीच लोकप्रिय झाली होती.

पुढे २०११ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याने पहिल्यांदाच डोक्यावरील कर्स केस काढून टाकले होते आणि टक्कल केले होते. जेव्हा-जेव्हा भारतीय क्रिकेट संघाने सर्वोत्तम कामगिरी केली, तेव्हा-तेव्हा धोनी नव्या लूकमध्ये चाहत्यांसमोर आला आहे. एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकल्यानंतर केसांचा त्याग करेल असा त्याने नवस केला होता, त्यानुसार त्याने टक्कल करून घेतले होते. पण आता त्याच्या या नव्या लूकची जोरदार चर्चा रंगत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.